Sudhir Mungantiwar News: मुख्यमंत्री दुसऱ्याच्या सांगण्यावरून राज्य चालवत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक - सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray: बारसूचा विरोध हा फक्त गुणात्मक प्रदूषण या बाबतीत नसून विरोधासाठी विरोध केला जात आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar Newssaam tv

Gondia News: बारसू रिफायनरीबाबत अंतिम तोडगा निघणार का? याबाबत बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशणा साधला आहे. बारसू प्रकल्पाला पूर्ण गावकऱ्यांचा विरोध नसून काही निवडक लोकांचा विरोध आहे. बारसूचा विरोध हा फक्त गुणात्मक प्रदूषण या बाबतीत नसून विरोधासाठी विरोध केला जात आहे.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच बारसूच्या जागेबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. आता ते म्हणतात की मी ते दुसऱ्याच्या सांगण्यावरून लिहिलं. मुख्यमंत्री असे दुसऱ्याच्या सांगण्यावरून पत्र लिहीत असतील तर ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar News
Mobile Side Effects : मोबाईलमुळे वाढतो उच्चरक्तदाबाचा धोका, हृदयावर होतो दुष्परिणाम! संशोधनातून धक्कादायक खुलासा

'त्यांच्या कार्यकाळात मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या'

यावेळी मुनगंटीवार यांनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला. आताचे मंत्री हे मंत्रालयात बसत नसून फिरत असतात अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आधीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे असताना ते कितीदा मंत्रालयात बसायचे त्याची श्वेतपत्रिका काढून लोकांना वाटा. त्यांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्या. हे मंत्रालयाचे काम आहे का? असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला. (Latest Political News)

Sudhir Mungantiwar News
Jalgoan News: भररस्त्यात तरुणीने तरुणावर केला चाकूहल्ला, जळगावचा Video होतोय व्हायरल

ओवैशींवर पलटवार

पतप्रधान नरेंद्र मोदी सिनेमा क्षेत्रात असते तरीही ते टाँपवर असते. असे एक कोटी ओवैशी जन्माला आले तरी नरेंद्र मोदी बनू शकत नाही असा पलटवार सुधीर मुनगंटीवार यांची असदुद्दीन ओवैशी याच्यावर केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com