Beed : लेक असावी तर अशी! पोलिस झाल्याचे श्रेय वडिलांना दिलं, खांद्यावर घेत काढली मिरवणूक

Beed Viral Video News : माजलगाव तालुक्यातील सुमय्यांनी दोन मुलांची जबाबदारी सांभाळत महाराष्ट्र पोलीस भरतीत यश मिळवले. आपल्या दिव्यांग वडिलांना खांद्यावर उचलून त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Beed : लेक असावी तर अशी! पोलिस झाल्याचे श्रेय वडिलांना दिलं, खांद्यावर घेत काढली मिरवणूक
Beed Viral Video NewsSaam tv
Published On
Summary
  • बीडच्या सुमय्यांचे पोलीस भरतीत यश

  • कठोर परिश्रम आणि जिद्दीमुळे स्वप्न साकार

  • दिव्यांग वडिलांना खांद्यावर उचलून व्यक्त केली कृतज्ञता

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण

योगेश काशीद, बीड

बाई चूल आणि मुलं या पलीकडे काय करू शकते असे अनेकदा म्हटलं जात. मात्र स्त्रियांनी हा समज खोडून टाकत समाजात आपली छाप उमटवली आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील एक महिला. मनात जिद्द असेल तर कोणतीही परिस्थिती यशाचा मार्ग रोखू शकत नाही, हे त्यांनी सिद्ध केले आहे. या महिलेचं नाव सुमय्या असे आहे. दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आणि घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही, सुमय्या यांनी महाराष्ट्र पोलीस भरतीत यश मिळवले असून त्यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात निवड झाली आहे. या निवडी नंतर सुमय्या यांनी केलेल्या एका कृतीचे कौतुक होत आहे. तसेच त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुमय्या यांचा हा प्रवास सोपा नव्हता. पदरात दोन लहान मुले असताना घराची जबाबदारी सांभाळून त्यांनी अभ्यासासाठी आणि शारीरिक कसरतीसाठी वेळ काढला. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेतले. कौटुंबिक अडचणींवर मात करत त्यांनी पोलीस होण्याचे आपले स्वप्न उराशी बाळगले होते. अखेर त्यांच्या या चिकाटीला फळ मिळाले असून त्या आता खाकी वर्दीत जनसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.

Beed : लेक असावी तर अशी! पोलिस झाल्याचे श्रेय वडिलांना दिलं, खांद्यावर घेत काढली मिरवणूक
Crime News : "तू मला आवडतेस..." बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग; ओढणी ओढली अन्...

सुमय्या यांच्या निवडीनंतर दिंद्रुडमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, या सगळ्या आनंदोत्सवात एका दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. आपल्या यशाचे श्रेय देताना सुमय्या यांनी आपले दिव्यांग वडील शरीफभाई यांना खांद्यावर उचलून धरले आणि मिरवणूक काढली. एका पोलीस झालेल्या कन्येने आपल्या दिव्यांग वडिलांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता बघून संपूर्ण गाव भारावून गेला होता. आजच्या काळात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत अनेक तरुण खचून जातात, अशा वेळी दोन मुलांची आई असतानाही सुमय्या यांनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com