Sharad Pawar News: PM मोदी- शरद पवार यांची भेट टाळण्यासाठी 'मविआ'कडून जोरदार प्रयत्न; पण...

Sharad Pawar Meets PM Modi: पवारांनी जाऊ नये अशी इंडियामधील नेत्यांची भूमिका आहे. मात्र शरद पवार यांच्या नियोजित
Sharad Pawar On PM Narendra Modi
Sharad Pawar On PM Narendra Modisaam tv
Published On: 

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (१ ऑगस्ट) पासून पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात मोदींना टिळक पुरस्काराने सन्मानीत केलं जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार की ते राज्यसभेत उपस्थित राहणार असा प्रश्न निर्माण झालाय. अशात आता याबाबात मोठी माहिती समोर आली आहे. टिळक पुरस्काराला पवार हजेरी लावणार आहेत. (Latest Marathi News)

१ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकारसंबंधी एक विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहावं अशी केजरीवालांची विनंती होती. मात्र शरद पवार टिळक पुरस्काराला हजेरी लावणार आहेत. पवारांच्या हस्ते मोदींना पुरस्कार दिला जाणार आहे.

Sharad Pawar On PM Narendra Modi
Pune News | पंतप्रधान मोदी पुणे दौरा करणार, युवक काँग्रेसकडून मोदींचे अनोखे बॅनर

पवारांनी जाऊ नये अशी इंडियामधील नेत्यांची भूमिका आहे. मात्र शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्यात टिळक पुरस्कार कार्यक्रमाचा देखील समावेश आहे. उद्या इंडियामधील पक्ष पंतप्रधान मोदी यांना विरोध करणार आहेत. व्यासपीठावर मात्र शरद पवार (Sharad Pawar) आणि सुशीलकुमार शिंदे दोघेही उपस्थित राहणार आहेत.

PM नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे सकाळी ६ पासून रस्ते बंद ठेवायचा आदेश देण्यात आलाय. या आदेशामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्याची देखील तोंडी सूचना देण्यात आलीये. शाळा सुरू राहणार की नाही याबाबत देखील स्पष्टता नाही.

Sharad Pawar On PM Narendra Modi
Sanjay Raut News : शरद पवार गटाच्या आमदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरुये? चर्चेला राऊतांकडून दुजोरा

मोदी यांच्या दौऱ्याचा वाटेत शहराचा मध्यवर्ती भाग आहे. या मध्यवर्ती भागात अनेक शाळा आहेत. रस्ते बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांना देखील सुट्टी देण्यात येणार का असा प्रश्न पालकांना पडलाय. सकाळी ६ ते ३ दरम्यान रस्ते बंद ठेवणार असल्याची पोलिसांनी घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.