Stray Dogs : खर्डीत भटक्या कुत्र्यांची दहशत, विद्यार्थींनीसह 15 जणांचा घेतला चावा

या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
stray dog , khardi (shahapur)
stray dog , khardi (shahapur)saam Tv

- फय्याज शेख

Shahapur News : शहापूर तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भटक्या कुत्र्यांनी तब्बल 15 जणांना चावा घेतला आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्याचा समावेश असल्याने पालक धास्तावले आहेत. (Maharashtra News)

stray dog , khardi (shahapur)
Solapur News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! हुतात्मा एक्सप्रेस, इंटरसिटी रद्द; जाणून घ्या कारण

या घटनांबद्दल मिळालेली माहिती अशी - शाळेत गेलेली सुप्रीया वाते सहावीत शिकणाऱी विद्यार्थ्यींनी पुन्हा वस्तीगृहात परत येताना भटक्या कुत्र्यांनी तिच्या पायाचा चावा घेतला. या विद्यार्थ्यांनीला सोडविण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा देखील कुत्र्याने चावा घेतला.

stray dog , khardi (shahapur)
PMPML Bus Service : पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढवा, मावळातील प्रवाशांची मागणी

यामुळे भटक्या कुत्र्यांची खर्डी गावात दहशत निर्माण झाली आहे. लहान मुलांना शाळेत कसे पाठवायचे अशा प्रश्न पालकांना पडला आहे. आतापर्यंत या कुत्र्यांनी 15 जणांना चावा घेतला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महापालिका क्षेत्रातील भटके कुत्रे पकडून ग्रामीण भागात सोडले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात देखील भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर होत चालला आहे अशी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Edited By : Siddharth Latkar

stray dog , khardi (shahapur)
Raju Shetti : 'स्वाभिमानी' चा साखर कारखानदारांच्या विराेधात ढाेल बजाओ, राजू शेट्टींची पुढच्या आंदाेलनाची दिशा स्पष्ट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com