Sangli News : सांगलीत शनिवारी भरणाऱ्या बाजाराला बसण्यास बंदी घातल्यामुळे संतप्त विक्रेत्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वाहनावर दगडफेक केली. यावेळ काहींनी अग्निशमन विभागाच्या वाहनाचा काचा फोडल्या. या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दगड फेकणाऱ्यांवर कारवाई केली. (Maharashtra News)
सांगली महापालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे एकत्रित दिवाळी उत्सव (Diwali Festival) आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील रस्त्यावर बसून व्यवसाय व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांना जागाही दिली जाणार आहे.
त्यामुळे आज (शनिवार) महापालिके समोरील मदन भाऊ संकुल या ठिकाणी बसणारा बाजार दिवाळी काळापुरता स्थलांतरित करण्याचे आदेश महापालिका प्रशासन काढले होते. याला विरोध करत आज येथील व्यवसायिकांनी घोषणाबाजी केली.
त्या ठिकाणी असणाऱ्या महापालिकेचे अग्निशमन गाडीवरच दगडफेक केली. यामध्ये अग्निशमन गाडीच्या काचा फोडण्यात आले. या घटनेमुळे सांगलीतील शनिवार बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दगडफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या ठिकाणी व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी या विक्रेत्यांनी महापालिकेसह पाेलीसांना केली आहे. तूर्तास विक्रेत्यांच्या मागणीवर महापालिकेने काेणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.