Vinayak Raut News, cm eknath shinde, devendra fadnavis
Vinayak Raut News, cm eknath shinde, devendra fadnavissaam tv

Sindhudurg News : तेव्हां गृहखातं काय झोपा काढत होतं का? : खासदार विनायक राऊत

उबाठा पक्षाच्या नेत्यांवर ईडीच भूत मागे लावण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले.
Published on

- विनायक वंजारे

Sindhudurg News : मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र सरकराने विशेष अधिवेशन बाेलाविले आवश्यक हाेते. परंतु सरकारने तसं केले नाही अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर केली आहे. दरम्यान मराठा (maratha reservation) व धनगर आरक्षणाचा (dhangar reservation) प्रश्न सुटावा यासाठी राष्ट्रपती यांना देखील भेटणार असल्याचे खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Vinayak Raut News, cm eknath shinde, devendra fadnavis
Maval News : मनमानी विराेधात एकवटले शेतकरी, श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर उद्या काढणार माेर्चा

खासदार राऊत म्हणाले संसदेच विशेष अधिवेशन बोलवून महाराष्ट्रातील मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर कायदा करावा या मागणीसाठी राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. आम्ही वेळ मागितली आहे. अजून वेळ मिळाली नसली तरी आज वेळ मिळेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना भेटायची तयारी दाखवली आहे असेही खासदार राऊतांनी म्हटले. ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवणे गरजेचे होते मात्र ते झाले नाही अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.

खासदार राऊत म्हणाले सरकारचं नशीब मनाेज जरांगे पाटील यांनी (manoj jarange patil) यांनी 2 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. ही मुदत खूप जास्त दिल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी म्हटले.

ईडीच भूत मागे लावण्याचा भाजपाचा प्रयत्न

उबाठा पक्षाच्या नेत्यांवर ईडीच भूत मागे लावण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले ईडीचे लोक आता सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत. रवींद्र वायकर (ravindra waikar) यांचे हे प्रकरण जुने आहे. वायकरांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे असेही राऊत यांनी म्हटले.

Vinayak Raut News, cm eknath shinde, devendra fadnavis
Grampanchayat Election 2023 : सांगलीत ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यासाठी अघोरी कृत्य

गृहखाते काय झोपा काढत होते का?

खासदार राऊत यांनी ललित पाटील (lalit patil) याच्यावर कारवाई लवकर झाली पाहिजे होती असे सांगत ललित पाटीलला 9 महिने ससून रुग्णालयात दाखल केले असताना महाराष्ट्राचे गृहखात काय झोपा काढत होते का? गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे असे राऊत यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com