Onion Farmers: कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; नाशिक, संभाजीनगर, सोलापुरात उभारणार कांदा महाबँक

State Government Decision For Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कांद्याच्या साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. नाशिक ,छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर या ठिकाणी कांदा महाबँक उभारण्यात येणार आहे.
Onion Farmers: कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; नाशिक, संभाजीनगर, सोलापुरात उभारणार  कांदा महाबँक
State Government Decision For Onion Farmersbusiness standard
Published On

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. कांद्याची नासाडी रोखण्यासाठी आणि साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कांदा हे नाशवंत पीक असल्याने अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येणार आहे. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. याठिकाणी हिंदुस्थान अॅग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत सांगितले आहे. कांदा महाबँक ह्या कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त प्रमाणात होते, अशा ठिकाणी उभारल्या जाणार आहेत.

कांद्याचे उत्पादन जास्त होणारे भाग नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे विकरण प्रक्रिया केंद्र उभारुन कांद्याची महाबँक तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी याबैठकीत दिले. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com