Eknath Shinde News: राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक; कसा असेल प्रकल्प? CM शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

CM Eknath Shinde on Onion Bank in winter session: कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज सांगितले
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde NewsSaam Digital
Published On

CM Eknath Shinde on Onion Bank:

राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापना करण्यात आली आहे. या महाबँकेच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर हे मदत करत आहेत.या प्रकल्पासाठी न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज सांगितले. (Latest Marathi News)

राज्यातील अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

CM Eknath Shinde News
MNS Raj Thackeray News : राज ठाकरे रणांगणात उतरले! मनसे घेणार लोकसभेच्या २२ जागांचा आढावा; ठाकरे गटाने डिवचलं

साठवण क्षमतेच्या अभावामुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 'अणु ऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही. राज्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे कांदा पिकाचे उत्पादन वाढेल. शेतकऱ्यांच्या पिकास चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांचा दृष्टीने हा प्रकल्पही महत्वाचा आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबँकेविषयी सांगितले.

CM Eknath Shinde News
Sharmila Thackeray: 'आदित्य ठाकरे माझा पुतण्या, म्हणून...'; दिशा सालियन प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

'शेतकरी अन्नदाता असून संकटाच्या काळात त्याला मदत करण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतं. अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीसाठी सहकार्य करून पुढाकार घेतला आहे. याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले. तसेच या प्रकल्पाविषयी माहितीही दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com