Mumbai News : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर वडापाव-चहाचे स्टॉल लावणार, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

CM Eknath Shinde : राज्यात ‘पथविक्रेता कायदा २०१४’ची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. याविरोधात ‘महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन’च्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी २७ फेब्रुवारीला राज्यातील फेरीवाले वडापाव-चहाचे स्टॉल लावून निषेध मोर्चा काढणार आहेत.
Mumbai News
Mumbai NewsSaam Digital
Published On

Mumbai News

राज्यात ‘पथविक्रेता कायदा २०१४’ची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. याविरोधात ‘महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन’च्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी २७ फेब्रुवारीला राज्यातील फेरीवाले वडापाव-चहाचे स्टॉल लावून निषेध मोर्चा काढणार आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानातून दुपारी १२ वाजता रॅली सुरू होऊन ती ‘वर्षा’ निवासस्थानी धडकणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष अखिलेश गौड यांनी दिली.

रस्त्यावरील पथ विक्रेत्यांचा व्यवसाय संरक्षित करून त्यांचा विकास साधण्यासाठी २०१४ मध्ये कायदा बनविण्यात आला. कायदा बनून आज १० वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राज्यातील ३० लाख पथ विक्रेते त्यांच्या न्याय-हक्कांपासून वंचित राहिले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी, पदपथावरील गर्दी यासाठी पथ विक्रेत्यांना जबाबदार धरले जाते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकार, महापालिका, नगरपालिका आदींनी पथविक्रेता कायद्याची योग्य अंमलबजावणी केल्यास न्याय मिळेल. सोबत वाहतूक, पदपथ आदी प्रश्न मार्गी लागू शकतात. राज्य सरकार मात्र एकीकडे पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करायची नाही व दुसऱ्या बाजूला शहर प्रशासनाच्या अपयशाचे खापर गरीब, मेहनती पथविक्रेत्यांवर फोडायचे, असे दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचा आरोप गौड यांनी केला.

Mumbai News
Wardha News : मजुरांना गावी जायचं होतं..७ दिवसातच सेंट्रींग काढलं अन् अनर्थ झाला; स्लॅब कोसळून २ मजुरांचा मृत्यू

या आहेत मागण्या

फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा, कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत कोणत्याही पथारी व्यावसायिकावर कारवाई करू नये, फेरीवाल्यांचा तत्काळ सर्व्हे करा, कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा, आदी मागण्या फेडरेशनने केल्या आहेत.

Mumbai News
MVA Seat Allocation: मविआत जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत; तुतारी, मशालवरून नाना पटोले नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com