Wardha News
Wardha NewsSaam Digital

Wardha News : मजुरांना गावी जायचं होतं..७ दिवसातच सेंट्रींग काढलं अन् अनर्थ झाला; स्लॅब कोसळून २ मजुरांचा मृत्यू

Wardha Accident News : सात दिवसांपूर्वी शेतात ये-जा करण्यासाठी नाल्यावर मजुरांनी स्लॅब टाकला होता. या स्लॅबचे सेंट्रींग काढत असतानाच स्लॅब कोसळल्याने स्लॅबखाली दबून दोन छत्तीसगडी मजुरांचा मृत्यू झाला.
Published on

चेतन व्यास

Wardha News

सात दिवसांपूर्वी शेतात ये-जा करण्यासाठी नाल्यावर मजुरांनी स्लॅब टाकला होता. या स्लॅबचे सेंट्रींग काढत असतानाच स्लॅब कोसळल्याने स्लॅबखाली दबून दोन छत्तीसगडी मजुरांचा मृत्यू झाला. आर्वी तालुक्याच्या वाढोणा गावातील स्मशानभूमी जवळ ही दुर्घटना घडली असून अशोक वरकडे (३५), नवल टेकाम (३२) अशी मृतकांची नावे आहेत.

सात दिवसांपूर्वी स्मशानभूमी जवळील नाल्यावर नागरिकांनी कंत्राटदाराकडे नाल्यावर पूल टाकण्यासाठी मागणी केली होती. कंत्राटदार प्रफुल रामटेके याने मजुरांना नाल्यावर स्लॅब टाकण्यास सांगितलं. त्यानुसार सेंट्रींग टाकून स्लॅब टाकण्यात आला. स्लॅबवरील सेंट्रींग किमान २१ दिवस ठेवणे आवश्यक होत, माकत्र मजुरांना छत्तीसगडला आपल्या गावी जायचं होतं. त्यामुळे त्यांनी घाई करत अवघ्या सात दिवसांतच स्लॅबचं सेंट्रींग काढण्यासाठी घेतलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
MVA Seat Allocation: मविआत जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत; तुतारी, मशालवरून नाना पटोले नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

दरम्यान स्लॅबचं सेंट्रींग काढणं सुरू असतानाच स्लॅब कोसळला. या स्लॅबखाली दबून दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मजुरांना बाहेर काढलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Wardha News
Rohit Pawar Video : संपावर असलेल्या डॉक्टरांचा भरसभेत रोहित पवारांना फोन, नेमका काय संवाद झाला? व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com