State budget session
State budget sessionSaam Tv News

State Budget Session : उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Maharashtra State Budget Session : आज संध्याकाळी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published on

मुंबई : उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेश वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अधिवेशनापूर्वी आज सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे.

अधिवेशनाच्या आधीच आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अंबदास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

State budget session
Thane Crime : हात वाकलेले, शरीर संपूर्ण काळंकुट्ट पडलेलं, राहत्या घरात पेंटरचा मृतदेह आढळला; ठाण्यात खळबळ

आज संध्याकाळी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे, काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना देखील दारूबंदीबाबत सात हजार गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मालाडमध्ये घटना घडली आहे, बदलापूरमध्ये घटना घडली, अमरावतीमध्येही घटना घडली, सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

State budget session
Mumbai Airport: मुंबई एअरपोर्टवर उतरली, सतत पोटाला हात लावत होती, पोलिसांची नजर पडताच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com