
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका ब्राझिलियन महिला अटक केली. या महिलेकडून पोलिसांनी तब्बल ११ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. कोकेनची तस्करी करण्याचा या महिलेचा प्रयत्न मुंबई एअरपोर्टवर पोहचताच पोलिसांनी उधळवून लावला. या महिलेने हे कोकेन ज्या पद्धतीने भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला ते ऐकून पोलिसही हादरले.
मुंबईमध्ये ड्रग्जची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ब्राझिलियन महिलेला पोलिसांनी अटक केली. ही महिला मुंबई एअरपोर्टवर दाखल झाली. तेव्हा ती सतत पोटाला हात लावत होती. त्यामुळे पोलिसांनी तिची विचारपूस केली. यावेळी या महिलेची चौकशी केली असता जी माहिती समोर आली ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. या महिलेने कोकेनच्या तब्बल १०० कॅप्सूल गिळल्या होत्या. पण तिचा मुंबईत कोकेन आणण्याचा प्रयत्न फसला. तिने मुंबईत आणलेल्या या कोकेनची किंमत १०.९६ कोटी रूपये इतकी आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साओ पाउलोहून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेल्या महिलेला अटक केली. या महिलेच्या चौकशीनंतर तिने भारतात तस्करी करण्यासाठी कोकेन कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर या महिलेला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या शरीरातून १,०९६ ग्रॅम कोकेन असलेले सुमारे १०० कॅप्सूल जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत १०.९६ कोटी रुपये आहे.
एनडीपीएस कायद्यांतर्गत हे कोकेन जप्त करण्यात आले आणि त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. केंद्रीय एजन्सीने तिच्यावर अनेक आरोप लावले आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणे याचा समावेश आहे. या आरोपासाठी या महिलेला २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.