ST Fare Hike: एसटीच्या भाडेवाढीबद्दल मला कल्पना नव्हती, परिवहन मंत्र्यांनी केले हात वर

Pratap Sarnaik On ST Fare Hike: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या भाडेवाढीबाबत मोठं विधान केले आहे. 'एसटी भाडेवाढीची मला कल्पनाच नव्हती.', असं त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्यात.
ST Fare Hike: एसटीच्या भाडेवाढीबद्दल मला कल्पना नव्हती, परिवहन मंत्र्यांनी केले हात वर
Pratap Sarnaik On ST Fare HikeGoogle
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव

सर्वसामान्यांचा प्रवास सुखकारक करणारी आणि त्यांच्या खिशाला परवडणारी 'लालपरी' अर्थात एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

२५ जानेवारीपासून ही भाडेवाढ देखील लागू झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसलाय. अशामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या भाडेवाढीबाबत मोठं विधान केले आहे. 'एसटी भाडेवाढीची मला कल्पनाच नव्हती.', असं सांगत परिवहन मंत्र्यांनी हात वर केले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

धाराशिवमध्ये माध्यमांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी भाडेवाढीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'एसटी भाडेवाढ एकत्रितपणे केली ती प्रशासनातील काही लोकांच्या चुकीमुळे झाली आहे. मलाही भाडेवाढीची कल्पना नव्हती. हा निर्णय प्राधिकरण घेते. मलाही दुसर्‍या दिवशी कळाले. मला ही याचे आश्चर्य वाटले.'

ST Fare Hike: एसटीच्या भाडेवाढीबद्दल मला कल्पना नव्हती, परिवहन मंत्र्यांनी केले हात वर
ST Fare Hike: मुंबई-पुणे एसटी प्रवास ८० रूपयांनी वाढला, कोणत्या बसला किती तिकिट? A टू Z माहिती

एसटी भाडेवाढीवर परिवहन मंत्र्यांनी आता हात वर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तसंच, 'मी अधिकाऱ्यांनाही विचारलं एवढी मोठी दरवाढ होते आपल्याला काहीच माहिती नाही. एखादी संस्था चालवायची म्हटल्यावर असे निर्णय घ्यावेच लागतात. यापुढे दरवर्षी ठराविक पद्धतीने कमी वाढ केली जाईल.' असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ST Fare Hike: एसटीच्या भाडेवाढीबद्दल मला कल्पना नव्हती, परिवहन मंत्र्यांनी केले हात वर
ST Bus Fare Hike : एसटी बसचे नवे दर लागू, लालपरी ते शिवनेरी...कोणत्या बसला किती तिकीट, जाणून घ्या सविस्तर

प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, 'वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यामुळे एसटीवर जवळपास ३ कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटीच्या तिकटामध्ये वाढ करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षित असते मात्र मागील काही वर्षांपासून दरवाढ करण्यात आलेली नाही.' एसटीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्यांना प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. ऐवढी मोठी दरवाढ केल्यामुळे प्रवासी नाराज झाले आहेत.

ST Fare Hike: एसटीच्या भाडेवाढीबद्दल मला कल्पना नव्हती, परिवहन मंत्र्यांनी केले हात वर
ST Buses : भाडेतत्त्वावर बसेस नकोच, एसटीकडून दरवर्षी ५००० बस खरेदी, राज्य सरकारचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com