ST Fare Hike: मुंबई-पुणे एसटी प्रवास ८० रूपयांनी वाढला, कोणत्या बसला किती तिकिट? A टू Z माहिती

ST Fare Hike News: एसटीचा प्रवास महागला आहे. एसटीच्या तिकीट दरामध्ये वाढ झाली आहे. जाणून घ्या एसटीच्या तिकीटांचे वाढलेले दर.
ST Fare Hike
ST Fare HikeSaam Tv
Published On

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटीच्या तिकींटामध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेल, टायर, चोरीस या किंमतीत बदल झाला आहे. महागाईदेखील वाढली आहे. त्यामुळे एसटीच्या तिकींटामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.४ वर्षांनी पुन्हा एकदा एसटीच्या तिकीटांमध्ये वाढ झाली आहे.

शिवनेरी, रातराणी, साधी एसटी, शिवशाही, शिवशाही शयनयान, शिवाई, जनशिवनेरी, विना वातानुकुलित शयनयान बस (Non-AC ST)या एसटी बसच्या तिकींटामध्ये वाढ झाली आहे.

ST Fare Hike
ST Buses : भाडेतत्त्वावर बसेस नकोच, एसटीकडून दरवर्षी ५००० बस खरेदी, राज्य सरकारचा निर्णय

एसटी बस वाढलेले दर (ST Fare Price)

साधी/जलद ८.७० रुपयांनी वाढ

हिरकणी ११.८५ रुपयांनी वाढ

शिवनेरी (AC) १८.५० रुपयांनी वाढ

शिवशाही १२.३५ रुपयांनी वाढ

शिवशाही शयनयान १३.३५ रुपयांनी वाढ

नॉन-एसी शयन आसनी ११.८५ रुपयांनी वाढ

जनशिवनेरी ११.९५ रुपयांनी वाढ

विनावातानुकुलीत शयनयान बस १२.८५ रुपयांनी वाढ

एसटीचे वाढलेले दर नवीन दर (ST New Fare)

दादर- पुणे स्टेशन (शिवनेरी)- ५१५ रुपये

दादर- पुणे (स्वारगेट) (शिवनेरी)- ५३५ रुपये

ठाणे- स्वारगेट (पुणे) (शिवनेरी)- ५१५ रुपये

बोरीवली-स्वारगेट (पुणे) (शिेवनेरी)- ६१० रुपये

छत्रपती संभाजीनगर-पुणे (शिवाजीनगर) (शिवनेरी)- ७६५ रुपये

पुणे (शिवाजीनगर)-नाशिक (जनशिवनेरी)- ५०० रुपये

स्वारगेट (पुणे)- कोल्हापूर (जनशिवनेरी)- ५४० रुपये

पुणे (शिवाजीनगर)- नाशिक (शिवशाही)- ४७५ रुपये

छत्रपती संभाजीनगर- पुणे (शिवाजीनगर) (शिवशाही)- ५०० रुपये

स्वारगेट पुणे-कोल्हापूर (शिवशाही)- ५०० रुपये

बोरीवली-सातारा (शिवशाही)- ६४५ रुपये

ST Fare Hike
ST Fare Hike : लालपरीचा प्रवास महागला, 15 टक्के भाडेवाढ, तिकिटाचे नवीन दर काय?

मार्ग जलद/रातराणी निम-शयन आसनी शिवशाही

  • मुंबई - कोल्हापूर ५८० ७९० ८६५

  • मुंबई - कराड ४७५ ६४५ ७१०

  • मुंबई - रत्नागिरी ५३० ७१५ ७८५

  • मुंबई - धुळे ५१५ ७०० ७६५

  • मुंबई - सोलापूर ६१५ ८३५ ९१५

  • मुंबई - छत्रपती संभाजीनगर ५६५ ७७० ८४०

  • मुंबई - अलिबाग १६५ २२० २४५

  • मुंबई - महाड २६५ ३६० ४००

  • मुंबई - पंढरपूर ५६० ७६० ८३०

  • नागपूर - अकोला ३७० ५१५ ५६५

  • नागपूर - पुणे १०८५ १४७५ १६१५

  • नागपूर - अमरावती १६५ २२५ २४५

  • नागपूर - नांदेड ५६० ७६५ ८३०

  • अमरावती- पुणे १०८५ १४७५ १६१५

  • नाशिक - पुणे २८५ ३८५ ४२५

  • लातूर - पुणे ४७५ ६४५ ७१०

  • छत्रपती संभाजीनगर - पुणे ३४५ ४७० ५१५

  • पुणे - जळगाव ५९० ८०० ८८०

  • पुणे - सातारा १५५ २०५ २३०

  • पुणे - सोलापूर ३७० ५०५ ५५५

  • बोरीवली- रत्नागिरी ५५५ ७५५ ८२५

ST Fare Hike
ST Bus News : परिवहन मंत्र्यांनी मांडला पुढचा प्लान, एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षाला आणणार ५००० लालपरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com