MSRTC News: एसटी चालकांना मोबाईलवर बोलण्यास प्रतिबंध; अपघात रोखण्यासाठी एसटी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

MSRTC News: एसटी प्रशासनाकडून चालकांना मोबाईलवर बोलण्यास बंदी घालण्यात आलीय.
MSRTC News: एसटी चालकांना मोबाईलवर बोलण्यास प्रतिबंध; अपघात रोखण्यासाठी एसटी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

MSRTC News:

गेल्या काही दिवसात रस्ते अपघात होण्याचे प्रमाण वाढलंय. अपघाताचे सत्र थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतलाय. एसटी प्रशासनाकडून चालकांना मोबाईलवर बोलण्यास बंदी घालण्यात आलीय. राज्यातील एसटी बसेसची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहेत त्यात चालकांकडून वाहन चालवताना मोबाईलचा वापर होत असल्यानं त्यांचे बसवरील एकाग्रता कमी होत असते. (Latest News)

यामुळे एसटी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. एसटी बस चालवत असताना मोबाईल बोलणे अथवा हेडफोन घालून गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निर्देश प्रशासनाने दिलेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑगस्ट महिन्यात एक अहवाल आला होता, त्यानुसार, मागील ५ वर्षांत सर्वाधिक अपघात झाल्याचं एसटीचे झाले आहेत. अहवालानुसार, २०२२-२३ आर्थिक वर्षात राज्यात एसटीचे एकूण ४ हजार ६५९ अपघात झाले आहेत. यात ३४३ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३ हजार ५८४ जण जखमी झाले असल्याचं वृत्त मागे एका वृत्तसंस्थेनं दिलं होतं.

सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशी एसटी बसाची निवड करतात. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवत असताना मोबाईलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, मोबाईलवर व्हिडिओ पाहणं अत्यंत धोकादायक असल्यानं बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुरक्षितता वाटते.

बस चालवत असताना चालक मोबाईलचा वापर करत असतात. याविषी सोशल मीडियातून लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून कडक पावले उचलत आहे. बस चालक बस चालवत असताना मोबाईलचा वापर करत असेल तर संबंधित चालकांवर निलंबनापर्यंतची कारवाई करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले असल्याचं जनसंपर्क अधिकारीने माध्यमांना सांगितले आहे.

MSRTC News: एसटी चालकांना मोबाईलवर बोलण्यास प्रतिबंध; अपघात रोखण्यासाठी एसटी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
Akola Accident: बस आणि दुचाकीचा भीषण अपघात! २० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; संतप्त जमावाने महामार्ग रोखला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com