रत्नागिरी-महाड-वसई एसटी बसचा हातखंबा येथे अपघात झाला आहे. रत्नागिरीहून महाड दौऱ्यावर जाताना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समोरच हा अपघात झाला. अपघातस्थळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः कारमधून उतरून मदत केली.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उदय सामंत यांनी स्व:ताच्या एस्कॅार्ट करणाऱ्या कारमधून रुग्णालयात पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीहून महाडच्या दौऱ्यावर जात होते. त्यावेळी हातखांबा येथे त्यांच्या कारच्या समोरच रत्नागिरी-वसई एसटी बसला अपघात झाला.
बसमध्ये एकूण २१ प्रवासी अडकले होते. आपघात पहिल्यानंतर उदय सामंत स्वतः कारमधून खाली उतरले आणि अपघातग्रस्त प्रवाशांना मदत सुरू केली. उदय सामंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह एसटी बसमध्ये अडकलेल्या २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले. (Accident News)
उदय सामंत यांचा महाडचा दौरा नियोजित असताना एसटी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ आपल्या एस्कॅार्ट करणाऱ्या कारमधून हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या तात्काळ मदती बद्दल एसटी अपघातात सापडलेल्या प्रवाशांनी आभारही मानले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.