SSC-HSC Supplementary Exam Result 2023: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; कुठे पाहाल? वाचा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज सोमवारी जाहीर करण्यात आला आहे.
SSC-HSC Supplementary Exam Result 2023
SSC-HSC Supplementary Exam Result 2023Saam tv
Published On

SSC-HSC Supplementary Exam Result 2023:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारी १ वाजल्यापासून www.mahresult.nic.in' या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (Education) मंडळातर्फे पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी परीक्षा १८ ते १ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. या नऊ विभागीय मंडळामार्फत घेतलेल्या दहावीच्या पुरवणीची परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी जाहीर झाला आहे.

SSC-HSC Supplementary Exam Result 2023
Rajasthan Crime News: राजस्थानच्या 'कोटा'त लातूरच्या तरुणाची आत्महत्या, २४ तासात २ विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं

तर बारावीची पुरवणी परीक्षा (Exam) १८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान घेण्यात आली. तसेच माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट यादरम्यान परीक्षा घेण्यात आली.

तत्पूर्वी, राज्यात २० जुलै रोजी असलेल्या बारावीची परीक्षा ११ ऑगस्ट तर दहावीची परीक्षा २ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. तसेच २८ जुलै रोजी असलेल्या १० वीच्या विषयाची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

पुरवणी परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या वेबसाईटवर अर्ज करता येईल.

SSC-HSC Supplementary Exam Result 2023
Mira Road Railway Station: रेल्वे प्लॅटफॉर्मवर घुसवली रिक्षा, दारूच्या नशेत रिक्षाचालकाचा प्रताप

तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरून प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. याचबरोबर उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर त्यानंतर पुढील कामाच्या ५ दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com