SSC-HSC: दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय! जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिले आदेश

SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आता पर्यवेक्षकांच्याही मोबाईलचे कॅमेरे सुरु ठेवण्यात येणार आहेत.
SSC-HSC
SSC-HSCSaam Tv
Published On
Summary

दहावी बारावीच्या परीक्षासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी ठोस पाऊले उचलली

आता पर्यवेक्षकांचेही मोबाईलचे कॅमेरे राहणार सुरु

दहावी बारावीच्या परीक्षा लवकरच होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. आता सर्व केंद्रांनी वॉल कंपाउंड असणार आहे.

SSC-HSC
SSC Exam 2026 Form : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख ठरली, किती असेल फी?

सीसीटीव्ही कॅमेरे राहणार सुरु

परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणाप आहेत. यातसोबत आता प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे. मोबाईलवर झूम अॅप सुर करुन हे नियंत्रण कक्षाला जोडता येणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रत्येक केंद्राची पडताळणी करण्यात आली. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत, तिथे बसवण्याचे आदेश दिले आहे. वॉल कंपाउंड तुटले असेल तर तिथे तारेचे कपांउंड करण्यात आले आहे.

या वर्षापासून पर्यवेक्षकाची सरमिसळ केली जाणार आहे. शहरातील पर्यवेक्षक दुसऱ्या शाळांमध्ये तर ग्रामीण भागातील पर्यवेक्षक दुसऱ्या केंद्रांवर नेमले जाणार आहे. यामुळे शाळेत ओळखीचे पर्यवेक्षक नसणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले लक्ष राहणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु राहणार आहेत. यावर जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

SSC-HSC
10th Board Exam : १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! वर्षातून दोनवेळा होईल बोर्डाची परीक्षा, मुलांना एका वर्षात दोनदा संधी

दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीसीटीव्हीसोबत आता पर्यवेक्षकांचेही विद्यार्थ्यांवर चांगले लक्ष असणार आहे. पर्यवेक्षकांना आता त्यांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु ठेवावे लागणार आहेत.

SSC-HSC
SSC-HSC : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय, आताच वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com