SSC HSC Exam : जाणून घ्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे विषयनिहाय वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
SSC Exam Time Table 2022: दहावीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नियमावली
SSC Exam Time Table 2022: दहावीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नियमावलीSaam Tv

- रश्मी पुराणिक

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.

SSC Exam Time Table 2022: दहावीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नियमावली
मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणासारखी तत्परता महाराष्ट्रातील आरक्षणांसाठी का नाही?

त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com