Ranbhaji Mahotsav : गडचिरोलीत रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल 70 हून अधिक रानभाज्यांची विक्री

Gadchiroli Ranbhaji Mahotsav : मानवी आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्याचे अन्यन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविधभाज्यांचा समावेश असतो.
Gadchiroli Ranbhaji Mahotsav
Ranbhaji MahotsavSaam Tv
Published On

गडचिरोली जिल्हा हा 'वनव्याप्त जिल्हा'म्हणून ओळखला जातो. शिवाय गडचिरोली जिल्हा नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध असा संपूर्ण विभाग आहे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणेने गडचिरोलीत रानभाज्यांचा महोत्सव सुरू केला आहे. .गडचिरोलीकरांचा या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभलाय. या महोत्सवामध्ये तब्बल ७० पद्धतीच्या रानभाज्या दाखल झाल्या आहेत.

Gadchiroli Ranbhaji Mahotsav
Maharashtra Politics : मनसे-ठाकरे गट राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा...

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात वास्तव्याला असणाऱ्या आदिवासींना या कोसळधार पावसात तब्येत कशी टिकवून ठेवायची याचे गुपित माहित होते. ते होते त्या त्या भागातील रानभाज्या(Ranbhaji). या रानभाज्यांचे विविध पदार्थ या मोसमात जेवणात असले की तब्येत ठणठणीत.

विस्मरणात गेलेल्या अनेक रानभाज्या आजही दुर्गम आदिवासी भागात त्याच चवीने ग्रहण केल्या जातात. मात्र शहरी नागरिकांना याची माहितीच नसते. अशा भाज्यांची ओळख आणि त्यांचे आहारातील चलन वाढावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणेने गडचिरोलीत रानभाज्यांचा महोत्सव सुरू केला. गडचिरोलीकरांचा (gadchiroli )या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभलाय. तब्बल ७० रानभाज्या महोत्सवात दाखल झाल्या.

अळींबी, बांबू, काटवल, लालमाठ, वाघाटी, बोपली आणि राजगिरा, अंबाडी, कढीपत्ता, शरणी, अळू, चाकवत, बोरु, चवळी, आंबटचुका, करडई पाने, तांदुळजा, गुलवेल, कुयरी, वारकु, करडकोसला, करंजी, केना, पीठपापडा, विंचू, जिवती, फांदी, पोई, कुडा, टाकळा/तरोटा, पातुर, कपाळफोडी, आंबुशी, कुरडू, खापरखुटी, चिवळ, आघाडा, घोळभाजी, मटारु, भुईआवळा, सुरण, दिंडा यातील १०० टक्के रानभाज्या पावसाळ्यातील विविध आजारांना(illness) पळवून लावण्यासाठी गुणकारी आहेत.

Gadchiroli Ranbhaji Mahotsav
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची निवडणूक फंडासाठी दिल्लीत मोठी डील? शिंदे गटाचा गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेचं कनेक्शनही सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com