Solapur Reelstar Couple: प्रत्येक नवरा-बायकोनं बघावी अशी लव्ह स्टोरी! सोलापूरच्या कपलची संघर्ष कहाणी साऊथमध्ये झळकणार, VIDEO बघून डोळ्यात येईल पाणी

Solapur Reelstar Couple Narayan And Anjali Story: सोलापूरचे आकाश नारायणकर आणि अंजली हे कपल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. या कपलची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. या दोघांच्या आयुष्यावर साउथमध्ये लव मुड्डू नावाचा चित्रपट तयार केला आहे.
Solapur Reelstar Couple
Solapur Reelstar CoupleSaam Tv
Published On
Summary

सोलापूरच्या रिलस्टार कपलची लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर

साउथमध्ये प्रदर्शित होणार लव्ह मूड्डू चित्रपट

अंजली अन् नारायणचा संघर्ष पाहून डोळ्यात येईल पाणी

सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम आहे.फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो-रिल्स शेअर करत असतात. परंतु हेच रिल्स बनवणे एखाद्याचे आयुष्य जगण्याचे कारण असेल तर... याच रिल्समुळे एका मुलीला आयुष्य अजून उत्तम पद्धतीने जगण्याची प्रेरणा मिळाली आहे. सोलापूरातील एका जोडप्याने आपल्या निस्वार्थ प्रेमाची कहाणी रिल्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली आहे. त्यांच्या या गोष्टीवर साउथमध्ये नवीन चित्रपटदेखील तयार करण्यात आला आहे. (Solapur Couple Story)

Solapur Reelstar Couple
Viral Video News : हायवेवर स्टंट करताना भयंकर अपघात, शेवटची ३७ सेकंद काळजाचा ठोका चुकवणारी, VIDEO

सोलापूरचे हे कपल फक्त फेमस होण्यासाठी रिल्स बनवत नाही. तर हे तरुणीच्या आनंदाचे कारण बनले आहे. अंजलीबाई या नावाने सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या रिलस्टारची कथा आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

सोलापूरातील अंजली आणि आकाश नारायणकर हे कपल खूप प्रसिद्ध आहे. हे दोघेही खूप आधीपासून रिल्स बनवतात. या दोघांची लोकप्रियता खूप होती. मात्र, यांच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागावी अन् अख्खं आयुष्यचं उद्धवस्त व्हावं, असा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. (Solapur Couple Anjali and Narayan Lovestory Movie)

अंजली आणि आकाशचे लग्न झाले. त्यानंतरही ते सोशल मीडियावर रिल्स बनवत होते.परंतु काही दिवसातच अंजलीला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं. त्यानंतर त्यांचा संसार कोलमडला. परंतु नारायणने हार मानली नाही. अंजलीला आधार दिला.

अंजलीची सर्जरीदेखील झाली. मात्र, तिला एका बाजूने अर्धांगवायूचा झटका आला. तिची उजवी बाजू पूर्णपणे पॅरेलिसिस झाली. परंतु तरीही पती नारायणने त्याला भक्कम साथ दिली. या काळात अंजलीला आनंद मिळावा म्हणून त्याने रिल्स बनवायला सुरुवात केली. तिचा रुग्णालयातील प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवला.

Solapur Reelstar Couple
Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

आकाश आणि अंजलीचे रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. त्यांच्या या रिल्सची दखल चित्रपट निर्माते कुमार यांनी घेतली. त्यांनी या दोघांच्या आयुष्यावर लव्ह यू मुड्डू नावाचा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Solapur Reelstar Couple
Success Story: घर नाही तालीम नाही, नंदी बैल फिरवणाऱ्याच्या लेकाने पटकावलं सुवर्णपदक; कुस्तीपटू सनी फुलमाळीचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com