मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Activist Anjali Damania Husband Anish Damania : महाराष्ट्र सरकारने अंजली दमानिया यांच्या पतीवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे सारख्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघड केल्यांतर सरकारची डोकेदुखी वाढली होती.
Activist Anjali Damania Husband  Anish Damania
Maharashtra government rewards Anjali Damania’s husband with key responsibility.saam tv
Published On
Summary
  • अंजली दमानिया यांनी अनेकदा सरकारविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर आवाज उठवला.

  • अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले होते.

  • त्यांच्या पतीवर सरकार खूश असून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली.

राज्यातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार याविरोधात आवाज उठवून अंजली दामानिया सरकारमधील मंत्र्यांना सळो की पळो करून सोडत असतात. राज्य सरकारमधील अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान ठेवलं होतं. त्यांच्या आरोपामुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती.सरकारची डोकेदुखी ठरणाऱ्या अंजली दमानिया यांच्या पतीवर सरकार खूश असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवलीय.

अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांच्यावर महाराष्ट्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलीय. ही संस्था शाश्वत विकासासाठी धोरण आखणे व मार्गदर्शन करत असते. अंजली दमानिया यांच्या पतीला राज्य सरकारच्या संस्थेत मानद पदावर नियुक्त करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चेला सुरुवात झालीय.

एकाबाजुला अंजली दमानिया विविध राजकीय नेते, मंत्री आणि माजी मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणे उजेडात आणत असतात. पण त्याचवेळी त्यांच्या पतीची मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील संस्थेत नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या टीकेची झोड उठत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com