Viral Video: पापडीसारखा रस्ता, नागरिकांना खस्ता; नागरिकांमुळे बोगस रस्त्याचा पर्दाफाश

Barshi-Tuljapur Road: महिनाभरापूर्वी तयार केलेला बार्शी-तुळजापूर रस्ता नागरिकांनी हाताने उकरून दाखवला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पापडीसारखा रस्ता, नागरिकांना खस्ता; नागरिकांमुळे बोगस रस्त्याचा पर्दाफाश
Barshi-Tuljapur Road Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यात वारंवार निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची प्रकरणं समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यामध्ये रस्ता पापडीसारखा उकरला जातोय.

बार्शी - तुळजापूर रस्त्यावरील हा प्रकार आहे. उपळे दुमाला गावातील ग्रामस्थांनी मात्र या रस्त्यासाठी करण्यात आलेल्या कामाची पोलखोल केलीये. अवघ्या महिनाभरातच या रस्त्याची दुरवस्था झालीये.

पापडीसारखा रस्ता, नागरिकांना खस्ता; नागरिकांमुळे बोगस रस्त्याचा पर्दाफाश
Vasai Crime News: वसई हादरली! २५ सेकंदात तब्बल १२ वार, जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीला त्याने भररस्त्यात संपवलं

त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केलीये. बार्शीमधील उपळे दुमाला गावातील नागरीकांनी निकृष्ट दर्जाच्या बार्शी-तुळजापूर रोडच्या कामाची पोलखोल केली आहे.

पापडीसारखा रस्ता, नागरिकांना खस्ता; नागरिकांमुळे बोगस रस्त्याचा पर्दाफाश
Remote-controlled water drone : पाण्यात बुडणाऱ्यांना आता काही मिनिटांत वाचवता येणार? आंध प्रदेशात अवतरलं जीवदान देणारं ड्रोन

राज्यात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असं चित्र अगदी बड्या शहरांपासून गावांपर्यंत दिसतं. बार्शी- तुळजापूर रस्ताही त्याला अपवाद नाही....या रस्त्यावरच डांबर खाऊन खिसे भरणा-या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com