Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक! मनोज जरांगेंना पाठिंबा देत सोलापूर- बार्शी महामार्गावर 'रास्ता रोको'; वाहतूक ठप्प

Solapur Maratha Reservation Protest: सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भर पावसात जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक!  सोलापूर- बार्शी महामार्गावर रास्ता रोको; वाहतूक ठप्प
Solapur Maratha Reservation ProtestSaamtv

सोलापूर, ता. ११ जून २०२४

लोकसभा निवडणुकानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचे दिसत आहे. सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेत. अशातच सोलापूरमध्येही मराठा बांधव आक्रमक झाले असून सोलापूर बार्शी महामार्ग अडवत आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सोलापूरमध्ये मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच सोलापूर बार्शी महामार्गांवर मराठा बांधवांनी रास्ता रोको केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वैराग येथील मराठा बांधवांनी पाठिंबा दिला. यावेळी मराठा बांधवांनी भर पावसात आंदोलन केले. तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठा बांधवांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूर बार्शी महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली असून गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक!  सोलापूर- बार्शी महामार्गावर रास्ता रोको; वाहतूक ठप्प
Maharashtra Rain Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार पाऊस; ओढ्यांना पूर, पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत

दरम्यान, जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासाळली असून त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे लवकरच राजकीय नेते मंडळी जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक!  सोलापूर- बार्शी महामार्गावर रास्ता रोको; वाहतूक ठप्प
Maharashtra Politics: विधानसभेला काँग्रेसचे 'एकला चलो रे'! राज्यात २८८ जागा लढवण्याची तयारी? आमदाराचा मोठा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com