पराग ढोबळे, नागपूर|ता. ११ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले. उद्धव ठाकरेंबाबत असलेली सहानुभूतीची लाट, शरद पवारांच्या इंझावाती सभांमुळे फायदा झालेल्या काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवण्याचीही किमया केली. लोकसभेच्या यशानंतर उत्साह वाढलेली मविआ विधानसभाही एकत्रित लढण्याचे निश्चित असतानाच काँग्रेस एकला चलो रेच्या भूमिकेत असल्याचे विधान आमदार अभिजीत वंजारी यांनी केले आहे.
"उद्धव ठाकरे आणि संजय राऊत २८८ मतदारसंघात तयारीचे आदेश देऊ शकतात, तर मग काँग्रेस का नाही? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी २८८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत करावी, २८८ जागा लढल्यास कुठल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही," असे मोठे विधान आमदार अभिजीत वंजारी यांनी केले.
तसेच "लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं मोठा पक्ष ठरला," असा टोलाही त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला. काँग्रेसने स्वतंत्र लढावे यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा बूथ स्तरावरील आढावा घेऊन तो हायकमांडकडे पाठवणार असल्याचे वंजारी यांनी सांगितले.
"काँग्रेसचे अधिक आमदार निवडून आले तर नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आमची तयारी आहे. प्रि पोल किंवा पोस्ट करायचे हे ठरवावे लागतील, पण मुख्यमंत्री नाना पटोले व्हावे ही आमची इच्छा आहे," असेही आमदार वंजारी यावेळी म्हणाले. दरम्यान, काँग्रेस आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.