Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ५०० ट्रॅक्टर्सची भव्य रॅली; ४२ आंदोलकांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation Protest: बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ १३ डिसेंबरला ५०० ट्रॅक्टरसह भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
Maratha Reservation
Maratha ReservationSaamtv
Published On

Solapur News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपायला अवघे २ दिवस उरलेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांकडून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. अशातच बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या 42 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यभर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लक्षवेधी लढा उभारला असून राज्यभर त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या या सभांना मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय.

बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ १३ डिसेंबरला ५०० ट्रॅक्टरसह भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हा ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या ४२ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 143 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादी कोणाची?, पवार विरूद्ध पवार, अपात्रतेबाबतची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून

मुंबई मोर्चाची सरकारला धास्ती...

दरम्यान, २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास थेट मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटलांच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासनही अलर्ट झाले आहे. पोलिसांकडून नांदेडमध्ये ट्रॅक्टर चालकांना मराठा आंदोलक, तसेत नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका.. अशा नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकारावर मराठा बांधवांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (latest Marathi News)

Maratha Reservation
Manoj Jarange: आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजवलाच; मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला काय सांगितलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com