Manoj Jarange Patil: आईची जात मुलाला लागू करा...; जरांगेंची नवीन मागणी सरकार मान्य करणार का?

Maratha Reservation: आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना देखील जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केलीये. या मागणीमुळे सरकारसमोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV
Published On

माधव सावरगावे, साम टिव्ही, छत्रपती संभाजीनगर.

Maratha Reservation:

आई कुणबी असल्यास मुलाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, या मनोज जरांगेंच्या मागणीने सरकारसमोर तांत्रिक पेच निर्माण झालाय. कारण नोंदी सापडल्या तर रक्ताच्या नात्यात कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल असे सरकारने सांगितले होते. आता तोच आधार घेऊन आई आणि मुलाचे नाते हे रक्ता- मासाचे असल्यानं आईची जात मुलाला लागू करा असा आग्रह जरांगेंनी धरलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Pune Crime: जिथे गुन्हा, तिथेच शिक्षा! तोडफोड करणाऱ्या कोयता गँगची चौकातून धिंड; पुणे पोलिसांची कारवाई

सरकारसमोर तांत्रिक पेच

24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्यावरू आधीच राज्य सरकार अडचणीत सापडले असताना आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका नव्या मागणीने पुन्हा सरकारसमोर तांत्रिक पेच निर्माण झालाय. आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना देखील जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केलीये. या मागणीमुळे सरकारसमोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

आईची जात मुलाला लावायला अडचण काय?

आई आणि मुलाचे नाते हे रक्ता-मासाचे नाते असते. मग आईची जात मुलाला लावायला काय अडचण आहे असा मुद्दा समोर आलाय. मात्र जन्माने जात ठरवली जाते आणि आईची जात कुठलीही असली तरी मुलाला वडिलांची जात मिळते. त्यामुळे यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल, त्यामुळे आईची जात ही मुलाला देता येणार नाही असं सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

सरकारकडून हे शक्य नाही असं सांगण्यात आलं

राज्य सरकार आधीच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास मागेपुढे पाहत आहे. त्यात या नवीन मागणीमुळे सरकारसमोर पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सरकारकडून हे शक्य नाही असं सांगितले असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी मात्र त्या मुद्द्यावर आपण कायम ठाम आहोत, असा आज पुन्हा सांगितले.

आईची जात मुलाला लावावा असे आपण म्हणतात, आईची जात लावा मी यासाठी म्हणतोय, विदर्भात ती आई कुणबीमध्ये असते, मग तिच्या आरक्षणाचा मुलाला लाभ घेता येत नाही, असं जरांगेंनी म्हटलं. या मागणीमुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला असला तरीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सातत्याने पाठिंबा देणारे बच्चू कडू यांनीही सरकारच्या बाजूने आज सुरू मिसळला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी सरकारच्या सुरात सुरू मिसळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही, ज्या दिवशी या मुद्द्यावर चर्चा झाली त्या दिवशी स्वतः बच्चू कडू होते, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.

रक्ता- मासाच्या नात्यात आरक्षण

मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी सरसकट या शब्दाऐवजी दुसरे पर्यायी शब्द मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेत पुढे आले. त्यात रक्ता- मासाच्या नात्यात आरक्षण दिले जाईल अशी चर्चा झाली. आता तोच आधार घेऊन मनोज जरांगे यांनी आई आणि मुलाचे नाते रक्ता- मासाचे असल्यानं आईची जात मुलाला द्या, अशी मागणी केल्याने सरकार समोर मोठा पेच निर्माण झालाय. आता यातून बाहेर कसं पडायचं हा पेच आहे. कारण इकडे दिलेला शब्द आणि तिकडे कायद्याची चौकट सरकारच्या समोर आहे.

Manoj Jarange Patil
Bihar Crime: शेतात भाजीची पाने तोडताना सापडली, बाप लेकाने केलेल्या मारहाणीत १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; संतापजनक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com