Solapur News
Solapur NewsSaam tv

Solapur News: नातवाला पाहण्यासाठी गेल्यानंतर साधली संधी; कांद्याचे ८५ हजार अन् ११ तोळे सोने गायब

नातवाला पाहण्यासाठी गेल्यानंतर साधली संधी; कांद्याचे ८५ हजार अन् ११ तोळे सोने गायब
Published on

सोलापूर : घराला कुलूप लावून मुलाच्या सासरवाडीला गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी कांदा (Onion) विक्रीतून आलेले ८५ हजार रुपये आणि ११ तोळे सोने (Gold) घेऊन पोबारा केला. ही घटना होनसळमधील तानाजी लक्ष्मण पवार यांच्या घरी घडली. (Live Marathi News)

Solapur News
Aurangabad News: पुन्हा एका शेतकऱ्याने संपविले जीवन; आठवड्यातली चौथी आत्महत्या

उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळमधील तानाजी लक्ष्मण पवार हे घर बंद करून कुटुंबीयांसमवेत बार्शीतील मुलाच्या सासरवाडीला नातवाला पाहण्यासाठी गेले होते. परत आल्यानंतर त्यांना दरवाजा उचकटल्याचे लक्षात आले. त्यांनी घर उघडल्यानंतर घरातील कांद्याची आलेली पट्टी ८५ हजार रुपये रोख तसेच विविध प्रकारचे ११ तोळे दागिने जागेवर दिसून आले नाही.

पोलिसांकडून तपास सुरू

पवार यांनी घरातील चोरीबाबत तात्काळ (Solapur) सोलापूर तालुका पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थाळाची पाहणी करत पंचनामा केला. चोरी गेलेल्‍या मुद्देमालाची नोंद करत चोरांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com