खर्चासाठी मागितले पैसे..संपामुळे पगार नसल्‍याचे सांगून बाप आंदोलनात अन्‌ मुलाने घेतला गळफास

खर्चासाठी मागितले पैसे..संपामुळे पगार नसल्‍याचे सांगून बाप आंदोलनात अन्‌ मुलाने घेतला गळफास
suicide
suicidesaam tv
Published On

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचे आहे; असे सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलाने आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. त्याआधी त्याने वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. (solapur news st employee salary due to the strike the father and son took a stand suicide)

suicide
Jalgaon: आयसीयूत चार रुग्ण दाखल झाल्याने चिंता

अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा दुर्दैवी घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. अमर माळी याचे दयानंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो गेल्या काही दिवसात शांत शांत बसत होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली. वडिलांनी माझे काम दोन– तीन महिने झाले बंद आहे. मला पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ असे त्याला म्हणाले होते. बोलणे झाल्यानंतर वडील एसटीचे आंदोलन (St Strike) सुरू असलेल्या ठिकाणी गेले.

आईने जेवणासाठी केला आग्रह

वडील आंदोलनात गेल्‍यानंतर अमर देखील घराबाहेर गेला. त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई व त्याची काकू जेवण करत होते. आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला. मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या. आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता. आतून कडी लावलेली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला, शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला अमरला खाली उतरवले. त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले असता त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

अरे तुला पैसे दिले असते रे..वडीलांचा आक्रोश

अमरला पाहताच आईने हंबरडा फोडला. वडील आंदोलनामध्ये होते त्यांना त्यांच्या भावाने फोन करून घरी बोलावून घेतले. तुकाराम माळी हे घरी आले असता त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे समजले. अमर हे तू काय केलेस? माझा पगार झाला नसल्याने तुला पैसे नाही म्हणालो होतो. असे म्हणत ते ओक्साबोक्शी रडू लागले. मयत अमरचा परिवार मोठा आहे. त्याला चार काका, एक सख्खा भाऊ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com