Jalgaon: आयसीयूत चार रुग्ण दाखल झाल्याने चिंता

आयसीयूत चार रुग्ण दाखल झाल्याने चिंता
jalgaon corona
jalgaon coronasaam tv

जळगाव : जिल्ह्यात तिसरी लाट सक्रिय झाल्यापासून बुधवारी प्रथमच आयसीयूत चार रुग्ण दाखल होण्याची वेळ आली. नव्याने ४६९ रुग्ण बाधित आढळून आले असून, दिवसभरात त्या तुलनेत केवळ ७९० रुग्णच बरे झाल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही (Corona Positive) वाढली आहे. (jalgaon news corona update Anxiety due to admission of four patients in ICU)

jalgaon corona
रात्रीस खेळ चाले..खासदारांबद्दल मध्यरात्री रेखाटला आक्षेपार्ह मजकूर

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर चार महिन्यांपासून आयसीयूत अथवा ऑक्सिजनवर रुग्ण जाण्याची वेळ आली नव्हती. तिसरी लाट सुरू झाल्यापासूनही ही वेळ जवळपास दोन आठवडे टळली. मात्र, बुधवारी ४६९ रुग्ण नव्याने आढळून आले. शिवाय, आयसीयूतही चार रुग्णांना दाखल करावे लागले असून, सध्या ११ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७९ रुग्ण कोरोनामुक्त (Corona) झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या दोन हजार ८६८ झाली असून, त्यापैकी ६१ रुग्णांमध्येच लक्षणे आहेत. उर्वरित दोन हजार ८०७ रुग्ण लक्षणे विरहित आहेत.

चाचण्या वाढल्या

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Corona Update) काही दिवसांपासून रुग्णवाढ होत असताना चाचण्या त्या प्रमाणात वाढल्या नव्हत्या. बुधवारी मात्र चाचण्यांमध्ये वाढ झाली. आरटीपीसीआर व ॲन्टिजेन मिळून बुधवारी तीन हजार ९९२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६९ नवे बाधित समोर आले. चाचण्यांच्या तुलनेतील संसर्गदर दहा टक्क्यांपेक्षा अधिक असून, आयसीयूत रुग्ण आल्यानंतर आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

जळगाव शहरात सव्‍वाशे

कोरोना बाधितांचा आकडा जिल्‍ह्यात वाढता आहे. यात जळगाव शहरातील बाधितांचा आकडा चिंताजनक आहे. जळगाव शहरात सर्वाधित १२६ बाधित आढळले. याशिवाय, जळगाव ग्रामीण २२, भुसावळ ११८, अमळनेर ३७, चोपडा ५५, पाचोरा १३, धरणगाव ५, यावल ५, जामनेर ८, रावेर १, चाळीसगाव ३३, बोदवड, पारोळा व भडगाव तालुक्यात एकही रुग्ण नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com