सोलापूर : बार्शी शहरात कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पुणे येथील सामाजिक संस्थेला मिळाली. यावरून पोलिसांच्या (Police) पथकाने येथे छापा टाकून कुंटणखान्यातील दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. (Barshi) तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (Live Marathi News)
पुण्याच्या सामाजिक संस्थेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील तेलगिरणी चौकात कुंटणखाना चालवत येथे दोन परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय केला जात आहे; अशी माहिती मिळाली होती. यानंतर संस्थेने पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमवेत कुंटणखान्यावर छापा टाकला. येथे बनावट ग्राहक तयार करून कुंटणखान्यामध्ये पाठवण्यात आले. यानंतर खात्री पटताच पोलिसांनी धाड टाकली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सहा महिलांनाही घेतले ताब्यात
बनावट ग्राहक पाठवून त्याच्याजवळ देण्यात आलेली रक्कम तसेच रोख १७ हजार २०० रुपये रक्कम, दोन मोबाईल, इतर साहित्य असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून तेथील आवारात मिळालेल्या सहा इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.