Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

Solapur News : खासदार प्रणिती शिंदे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात अक्कलकोटच्या विकासकामांच्या मुद्द्यावरून वाकयुद्ध सुरु आहे
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर : भाजपच्या त्रासाला आणि त्यांच्या आमदाराला तुम्ही वैतागला आहात, हे आमदार फक्त जीआरवर आहेत. बाकी अस्तित्वात काही दिसत नाही. बाराशे- तेराशे कोटींचा निधी हा फक्त कागदावर आहे. मागच्या ५ वर्षात अक्कलकोट तालुक्यात काहीच विकासकामे झालेली नाही. त्यामुळे भाजपकडे माणुसकी आणि संस्कृती नाही; अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका केली आहे. 

खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात अक्कलकोटच्या विकासकामांच्या मुद्द्यावरून वाकयुद्ध सुरु आहे. दरम्यान (Solapur News) सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे अक्कलकोटचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 

Solapur News
PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

काही केले तरी विजय काँग्रेसचा 

खासदार शिंदे म्हणाल्या, कि एकीकडे महिलांवर बलात्कार करतात, चार वर्षांच्या लहान मुलीला पण सोडत नाहीत. तर दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून मत विकत घेण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे त्यांना कधीच माफी नाही. भाजपने साम, दाम, दंड, इडी, सिबीआय वापरला तरी विजय हा काँग्रेस आणि लोकशाहीचा होणार आहे. आता कोणीही किंगमेकर नसून जनताजनार्दन किंगमेकर ठरणार आहे.

Solapur News
Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

मुंबईत राहत असल्याने मतदारसंघातील कामे माहित नाही : कल्याणशेट्टी 
दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्या टिकेला भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. खासदार शिंदे यांना विनंती आहे की, त्यांनी मुंबई सोडून एकदा अक्कलकोटमध्ये यावं. अक्कलकोटमध्ये किती काम झाले, हे बघण्यासाठी मी स्वतः त्यांना घेऊन फिरतो. प्रणितीताई यांची अडचण आहे की, त्या मुंबईत राहत असल्यामुळे मतदारसंघातील विकासाची कामं त्यांना माहिती नाहीत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काहीतरी भाषण करायचं म्हणून केल असेल. मात्र काँग्रेसचे मूळ दुखणं ही लाडकी बहीण आहे. खासदार शिंदे यांच्याकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

विकासाचं नवीन परफेक्शन भाजपकडून सेट करण्यात आल आहे. भाजपच्या काळात कधीही दंगली झाल्या नाहीत. उलट काँग्रेसच्या काळात दंगली आणि बॉम्बस्फोट झाली आहेत. त्यामुळे खासदार शिंदे निवडून येऊन विकासाबाबत काही बोलू शकल्या नाहीत. सध्या दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ताळमेळ नसलेली आघाडी दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com