मनोज जयस्वाल
वाशीम : शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सोयाबीनची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. यामुळे काढलेला सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणत आहेत. यामुळे दिवाळीनंतर अर्थात मागील आठवडाभरातच वाशीम जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे.
दिवाळी संपल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असली, तरी शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे (Washim) वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे. आता आठवडाभरातच जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. शेतकरी (Farmer) सोयाबीन विक्री करत असला तरी सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
वाशीम जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असून त्यात एकट्या कारंजा बाजार समितीत (Bajar Samiti) गत गुरुवारपासून ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले. तर वाशिम बाजार समितीतही आठवडाभरात ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. याबाजार समितीत गुरुवारला १० हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचे बाजार समितीच्या लिलावातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.