शहीद जवान अमर रहे! जवान लक्ष्मण पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, गावच्या सुपुत्रासाठी ग्रामस्थांचे डोळे पाणावले

Solapur Soldier Laxman Pawar Funeral : रस्त्यावर दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी करत आणि पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव राहत्या घरी आणण्यात आलं.
Solapur martyr jawan laxman pawar funeral
Solapur martyr jawan laxman pawar funeralSaam Tv News
Published On

सोलापूर : भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान लक्ष्मण संजय पवार यांच्यावर आज शुक्रवारी रोजी गिरझणी येथील मूळग गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी, जवान लक्ष्मण पवार अमर रहे.. भारत माता की जय... वंदे मातरमच्या घोषणांनी स्मशानभूमी परीसर दुमदुमून गेला होता. तर, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी हे गीत अंत्यसंस्कार मिरवणुकीत अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथील जवान पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे भारतीय सैन्य दलात नायक रँक पदावर कर्तव्य बजावत होते. यावेळी जवान लक्ष्मण संजय पवार (वय ३३) यांचे १३ मे रोजी पश्चिम बंगाल येथे निधन झालं होतं. आज शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव अकलूज येथे आणण्यात आलं. अकलूजच्या महर्षी चौकापासून ते गिरझणीपर्यंत सजवलेल्या रथावर जवान लक्ष्मण पवार यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव ठेऊन अंत्यदर्शन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी सैनिकांसह हजारो नागरीक सहभागी झाले होते.

Solapur martyr jawan laxman pawar funeral
Nashik Crime : लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्त नवीन WhatsApp DP, नवऱ्याची मैत्रीण भडकली, नाशिकमध्ये तरुणाची हत्या

रस्त्यावर दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी करत आणि पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव राहत्या घरी आणण्यात आलं. यावेळी आई, वडील, भाऊ बहीण यांना शोक अनावर झाला होता. काही वेळ पार्थिव अत्यंदर्शनासाठी घरासमोरील उभारलेल्या मंडपात ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी हजारो नागरिकांनी भूमीपुत्राचे अत्यंदर्शन घेत सॅल्यूट केला. राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढून गिरझणी येथील स्मशानभूमीत जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पवार यांचे बंधु विकी पवार यांनी चितेला अग्नी दिला.

Solapur martyr jawan laxman pawar funeral
Devendra Fadnavis : बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय नाही; संजय राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com