Devendra Fadnavis : बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय नाही; संजय राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

Devendra Fadnavis on Sanjay Raut Book : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं उद्या अनावरण होत आहे.
Devendra Fadnavis on Sanjay Raut Book
Devendra Fadnavis on Sanjay Raut BookSaam Tv News
Published On

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं उद्या अनावरण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज या पुस्तकातील माहिती समोर आली असून संजय राऊत यांनी या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ईडीच्या कारवाईत संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी, १०० दिवस कारागृहात असलेल्या खासदार संजय राऊत यांनी तेथील अनुभवावर आधारीत 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेल्या मदतीची विस्तृत माहितीच संजय राऊत यांनी पुस्तकातून मांडली आहे. त्यामुळे, प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक वादग्रस्त व चर्चेत आहे. त्यावर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 'कथा कादंबऱ्या आणि बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही,' असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसंच, 'संजय राऊत काही खूप मोठे नेते नाहीत, त्यांचं सोडून द्या', असंही फडणवीसांनी म्हटलं.

Devendra Fadnavis on Sanjay Raut Book
8 कोटींची कॅश अन् 23 कोटींचं सोनं...; वसई विरार मनपा अधिकारी ईडीच्या जाळ्यात सापडला, मोठा घोटाळा समोर आणला

'संजय राऊतांच्या 'त्या' पुस्तकाचं नाव बद्दलण्याची गरज आहे. नरकातला राऊत असं पुस्तकाचं नाव ठेवावं,' संजय राऊत यांना यासाठी पत्रही पाठवणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच, 'या पुस्तकात स्वत:च राजकीय अधिपतन कसं असतं याचा लेखाजोखा मांडला, नैतिक दिवाळखोरीची कहाणी लिहिली आहे. भाजप सेना युती सर्वोत्तम होती, या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचं काम केलं. संजय राऊतसारख्या व्यक्तीनेच शिवसेना संपवली, हिंदुत्व विचारांशी फारकत घेऊन काँग्रेसचा दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याच काम केल्याचंही', बावनकुळे यांनी म्हटलं.

Devendra Fadnavis on Sanjay Raut Book
Jalgaon Accident : वडिलांच्या अपघातानंतर दुग्ध व्यवसायात हातभार, पण भाग्यश्रीला काळानं गाठलं; अपघातात करुण अंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com