Solapur Flood: सोलापूरात आभाळ फाटलं! ७२९ गावांना पुराचा फटका, २ लाख हेक्टर शेतीचं नुकसान; ६ जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

Heavy Rainfall In Solapur: सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे सोलापूरमधील नदी-नाल्यांना पूर आला. या पावसाचा फटका ७२९ गावांना बसला. या पावसामुळे ६ जणांचा मृत्यू झाला.
Solapur Flood: सोलापूरात आभाळ फाटलं! ७२९ गावांना पुराचा फटका, २ लाख हेक्टर शेतीचं नुकसान; ६ जणांचा मृत्यू
Solapur FloodSaam Tv
Published On

सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. जिकडं तिकडं पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. सोलापूरातील तब्बल ७२९ गावं पाण्याखाली गेली आहे. शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ४९ जनावरं आणि १५ हजारांपेक्षा जास्त कोंबड्या दगावल्या आहेत. पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण्यात यावी असे आदेश प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे २ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार १ ते २२ सप्टेंबरपर्यंत तब्बल १ लाख ९५ हजार ६३१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख २२ हजार ८८१ शेतकरी बाधित झाले आहेत. तर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ७२९ गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे.

सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४९ जनावरे, १५ हजार ४१ कोंबड्या देखील दगवल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५४१ घराची पडझड झाली तर ४०५८ जणांच्या घरात पाणी शिरलं. सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक अहवालतून माहिती ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अंतिम आकडेवारीत नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Solapur Flood: सोलापूरात आभाळ फाटलं! ७२९ गावांना पुराचा फटका, २ लाख हेक्टर शेतीचं नुकसान; ६ जणांचा मृत्यू
Beed Flood News : एनडीआरएफ पथकाची कौतुकास्पद कामगिरी, भर पावसात नवजात बाळ आणि महिलेची केली सुखरूप सुटका

अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराची परिस्थिती पाहता विभाग प्रमुखांना केंद्र न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर स्थितीत लोकांना मदतकार्य करण्यासाठी कोणत्याही विभागाचे खाते प्रमुख आणि कर्मचारी मुख्यालय सोडू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Solapur Flood: सोलापूरात आभाळ फाटलं! ७२९ गावांना पुराचा फटका, २ लाख हेक्टर शेतीचं नुकसान; ६ जणांचा मृत्यू
Sina River Flood : माढ्यात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली; नदीकाठच्या १८ गावांना महापुराचा वेढा, दीड हजार नागरिकांचे स्थलांतर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com