सोलापूरमध्ये (Solapur) धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर सोलापूरच्या जेलरोड पोलिस ठाण्यात (Jailroad Police Station) डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात पेशाने डॉक्टर असणाऱ्या पतीकडून पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याची घटना घडली. श्रीनिवास पिंडीपोल असे या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरच्या पत्नीने जबरदस्तीने गर्भपात केल्यामुळे सोलापूरच्या जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरला पोलिसांनी अद्याप अटक केली नाही.
डॉक्टर पतीने पत्नीला शिवीगाळ करून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल २०२३ पासून पत्नी सिद्धीचा छळ करत होते. सिद्धीच्या आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी डॉक्टरने दिली होती.
सतत पतीकडून होणाऱ्या छळाला सिद्धी कंटाळली होती. अशामध्ये गरोदर असलेल्या सिद्धीचा डॉक्टर पतीनेच गर्भपात केला. त्यामुळे सिद्धी आणि तिचे आई-वडील संतप्त झाले. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.