Solapur: कुणबी दाखल्यांवरुन पुन्हा वाद पेटणार? बोगस कुणबी दाखले रद्द करण्याची मागणी!

Kunbi Certificate News: सोलापुरात कुणबी दाखल्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे.सोलापुरातील माळशिरसमध्ये बोगस ओबीसी दाखले रद्द करण्याचे मागणी करण्यात आली आहे.

सोलापूर: माळशिरसमध्ये बोगस ओबीसी दाखले रद्द करण्यासाठी तहसीलदारांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार सतीश कुलाल (Satish Kulal) यांनी ही तहशीलदारांकडे तक्रार केली आहे. माहितीच्या अधिकारातून दाखल्यांची माहिती मागवली आहे.या तक्रारीवरुन पुन्हा मराठा-ओबीसी वाद पेटण्याची शक्यता आहे.सतीश कुलाल हे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे सहकारी आहेत.दरम्यान छ.संभाजीनगर या जिल्ह्यात 10744 इतके कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) वाटण्यात आले आहेत.जालन्यात 10014 कुणबी प्रमाणपत्राचे वाटप.तर हिंगोलीत 4799 इतेक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले गेले आहे.बीड जिल्ह्यात 90946 एवढे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com