Pune Zika Virus: चिंता वाढली! पुण्यात आढळले झिकाचे २ रुग्ण, डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला व्हायरसची लागण

Zika Virus 2 Patient Found In Pune: पुण्यात पहिल्यांदाच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे चिंता वाढली आहे. पुणे महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करणयात आल्या आहेत.
Pune Zika Virus: चिंता वाढली! पुण्यात आढळले झिकाचे २ रुग्ण, डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला व्हायरसची लागण
Zika News Saam TV
Published On

पुण्यामध्ये झिका व्हायरसचे (Zika Virus) शिरकाव केला आहे. पुण्यामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका डॉक्टर आणि त्यांच्या मुलाला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिला आहे. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर देखील आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. पुण्यात पहिल्यांदाच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करणयात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत. डॉक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे. दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत पण त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Pune Zika Virus: चिंता वाढली! पुण्यात आढळले झिकाचे २ रुग्ण, डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला व्हायरसची लागण
Pune Drugs Case: PMRDA आणि राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये, पुणे शहरासह परिसरातील हॉटेल- बारवर कारवाई सुरूच

ताप आणि अंगावर लाल चट्टे येत असल्याची लक्षणे दिसून आल्यामुळे डॉक्टरांनी स्वत:च्या रक्ताचे नमुणे १८ जून रोजी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठवले होते. त्यांना झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचा रिपोर्ट २० जून रोजी आला. यानंतर या डॉक्टरच्या मुलीमध्ये देखील झिका व्हायरसची सौम्य लक्षणे दिसून आली. तिच्या देखील रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रिपोर्ट आल्यानंतर तिला देखील झिकाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले.

Pune Zika Virus: चिंता वाढली! पुण्यात आढळले झिकाचे २ रुग्ण, डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला व्हायरसची लागण
Pune Drug News : पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर पालिकेचा हातोडा, धडक कारवाई

डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने या दोघांच्याही संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची तपासणी केली. पण या व्यक्तींमध्ये झिका व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या सर्व व्यक्तींवर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Pune Zika Virus: चिंता वाढली! पुण्यात आढळले झिकाचे २ रुग्ण, डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला व्हायरसची लागण
Pune Porsche Car Accident: पुणे अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, मृत तरुणीच्या भावाची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com