मराठी रिलस्टारचा रिअल लाईफमध्ये करूण अंत; ज्या हॉटेलमध्ये केले रिल्स तिथेच आत्महत्या

reelstar ends life : आभासी जगात लाखो फॉलोअर्सना आनंद देणारेच स्वतःच आयुष्याला कंटाळून जीवन संपवतात तेव्हा... रील लाईफच्या झगमगाटामागचं रिअल लाईफचं क्रूर वास्तव दाखवणारी एक घटना समोर आलीये. नेमकं ही घटना काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
reelstar news
reelstar ends life Saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

ही रील आहे मंगळवेढा तालुक्यात ब्रम्हपुरी येथील रिलस्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतीची मालकीण रोहिणी पाराध्येची... आपल्या रील्सनं सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या रोहिणी पाराध्येनं आत्महत्या केलीये... स्वतःच्या हॉटेलच्या ज्या स्वयंपाक घरात तिनं अनेक रिल्स बनवल्या, त्याच स्वयंपाक घरात रोहिणीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. दरम्यान, रोहिणी पाराध्येनं सोशल मीडियाच्या जगात आपलं स्थान कसं निर्माण केलं होतं पाहूयात...

रोहिणीनं पती निलेश पाराध्ये सोबत प्रेम विवाह केल्यानंतर काही काळ ते दोघं पुण्यात राहत होते. आणि तिथेच त्यांनी रिल बनवायला सुरुवात केली. त्यानंतर सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा फायदा घेऊन रोहिणी आणि तिचा नवरा निलेश पाराध्ये यांनी खवैय्यासाठी ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं. या व्यवसायात स्थिर होऊन आणखी नवीन शाखा काढण्याच्या तयारीत असताना रोहिणी पाराध्येनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

reelstar news
Crime News: सून तोकडे कपडे घालून रिल्स बनवायची; वैतागलेल्या सासू-सासऱ्याची आत्महत्या

या घटनेनंतर पती निलेश पाराध्येने मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. इतकंच नव्हे तर रोहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

व्यवसाय जोमात सुरू होता... खवैय्यांची गर्दी होत होती... आणि नवी शाखा सुरू करण्याचे वेधही लागले होते... मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच असं काय घडलं की रोहिणीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं?, यावरून आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. एकूणच काय तुमची रिअल लाईफ आणि रील लाईफ यात खूप फरक असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com