अरे बापरे! धावत्या स्कुटीच्या हेडलाइटमधून अचानक निघाला विषारी साप अन्...

धावत्या स्कुटीमधून अचानक साप निघाल्याची घटना समोर आली आहे. वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी.
Snake found in Scooty viral News
Snake found in Scooty viral NewsSaam TV
Published On

बीड: पावसाळ्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनो जरा ही बातमी वाचा. धडकी भरवणारा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. शेतातून दूध आणण्यासाठी अभिषेक लाखे हा तरुण शेतकरी स्कुटीवर जाताना घरापासून काही अंतरावर गेल्यावर अचानक हेडलाइटमधून एक साप बाहेर आला.

परंतु न घाबरता अभिषेक लाखे या तरुणाने स्कुटी थांबवली आणि सापाला बाहेर काढले. हा घोणस जातीचा कवड्या विषारी साप असल्याचे सांगितले जात असून, मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. बीडच्या (Beed) केज तालुक्यातील आडस या गावात हा प्रकार घडला आहे. (Snake found in Scooty at Adas village in Kej Taluka Beed viral News)

Snake found in Scooty viral News
Ahmednagar : एकाच कारने पाच जणांना दिली धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर ३ गंभीर जखमी

सध्या पावसाळ्याचे (Rain) दिवस असून, पाऊस पडल्याने जमिनीतील छिद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे साप बाहेर निघत आहेत. ते जागा मिळेल तिथे आसरा घेत आहेत. आडस येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पुरुषोत्तम तागड यांची स्कुटी रात्री त्यांच्या घराबाहेर उभी होती. तागड यांच्याकडे काम करत असलेला अभिषेक लाखे हा स्कुटीवरून दूध आणण्यासाठी शेतात निघाला होता. (Viral News)

Snake found in Scooty viral News
औरंगाबादेतील हृदयद्रावक घटना; काम करताना विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू

रस्त्यातच स्कुटीच्या हेडलाइटमधून एक साप (Snake) बाहेर आलेला दिसला. साप पाहताच सुरुवातीला घाबरले. परंतु प्रसंगावधान राखून स्कुटी थांबवली. जवळच असलेल्या वॉशिंग सेंटरवरील काहींना मदतीसाठी हाक दिली. त्यांनी येऊन त्या सापाला बाहेर काढले. घोणस जातीचा हा साप असल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकीस्वार घाबरले असते तर, स्कुटी पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दुचाकीस्वारांनी सकाळी दुचाकी बाहेर काढताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com