औरंगाबादेतील हृदयद्रावक घटना; काम करताना विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू

विजेचे वायर ओढण्याचे काम करीत असताना एक वायर दुसऱ्या वीज प्रवाह असलेल्या वायरवर पडल्याने शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.
Electric Shock
Electric Shock saam tv
Published On

औरंगाबाद : औरंगाबादमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजेचे वायर ओढण्याचे काम करीत असताना एक वायर दुसऱ्या वीज प्रवाह असलेल्या वायरवर पडल्याने शॉक (Shock) लागून चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात घडली आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवराखेडा नांदगीर वाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Aurangabad News In Marathi )

Electric Shock
Pune : मोडकळीस आलेल्या ४५० वाड्यांना पुणे महापालिकेकडून नोटिसा; नागरिक म्हणाले...

औरंगाबादमध्ये वायर वीज प्रवाह असलेल्या वायरवर पडल्याने शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला आहे. कन्नड तालुक्यातील हिवराखेडा नांदगीर वाडी या ठिकाणी सदर घटना घडली आहे. या घटनेत गणेश कारभारी थेटे (35) भारत बाबुराव वरकड (35) जगदीश मुरकुंडे( 40), अर्जुन वाळु मगर (26, सर्व रा. नावडी) या चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण कन्नड तालुक्यातील नावडी येथील होते.

Electric Shock
'जी गोष्ट घरात सुटत होती ...'शिंदे गटाच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेडा नांदगीर वाडी या शिवारात गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जुन मगर हे चारजण नवीन विद्युत प्रवाहाचे काम करत होते. विद्युत पोल उभे केले होते. त्या पोलवर नवीन तार ओढण्याचे काम चालू होते. ज्या ठिकाणी हे तार ओढण्याचे काम सुरू होते, तिथे मात्र विद्युत प्रवाह नव्हता. 300 फूट अंतरावरुन एका शेतकऱ्यांनी केबल ( वायर) टाकून लाईट नेली होती. तार ओढत असताना ती तार नेमकी त्या वायरवर पडली.

तार ओढत असताना ती तार वायरला घासली आणि थ्रिफेजचा संपूर्ण विद्युत प्रवाह त्या तारेत उतरला. थ्रिफेजची फुल लाईट असल्याने या चार जणांचा काही सेकंदात जागीत मुत्यू झाला. नवीन विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करताना अचानक विद्युत तारेत प्रवाह आल्याने या सर्वांचा मृत्यू झाला. ही बातमी गावात कळताच गावावर शोककळा पसरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com