'जी गोष्ट घरात सुटत होती ...'शिंदे गटाच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

राज्यात महाविकास आघाडी कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya sule
Supriya sule saam tv

पुणे : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तांतर घडून आलं आहे. राज्यात महाविकास आघाडी कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जी गोष्ट घरात सुटत होती, ती गोष्ट टेलिव्हिजन चॅनेलवर बघावी लागली', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ( Supriya Sule News In Marathi )

Supriya sule
'धनुष्यबाण' हा फक्त सच्चा शिवसैनिकांचा, तो बंडखोरांचा नाही, विनायक राऊत कडाडले

सुप्रिया सुळेंनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची सांत्वनपर भेट घेतली. काही दिवसापूर्वी दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन झालं होतं. आज सुप्रिया सुळेंनी इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी भरणेच्या गावात भरणेंची भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्यावेळी खासदार सुळे यांनी शिंदे गटाच्या बंडखोरीवर भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'जे झालं ते दुर्दैवी झालं. जी गोष्ट घरात सुटत होती, ती गोष्ट टेलिव्हिजन चॅनेलवर बघावी लागली. नात्यातील ओलावा ज्या पद्धतीने उलगडला, तो दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्रातील राजकारणाला शोभणारं नव्हतं'.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी न मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या,'ते रोज नवीन नवीन कारणे देत होते. ते का सोडून गेले त्यांनाच विचारावं लागेल'. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या ईडी चौकशीवर भाष्य करताना त्यांनी केंद्र सरकार टीका केली. सुळे म्हणाल्या,'मला धाडीबद्दल काहीच आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्यावर १०९ वेळा धाडी टाकल्या आहेत. तो एक जागतिक विश्वविक्रम झालेला आहे. धाडी टाकणे ही केंद्र सरकारसाठी नवीन गोष्ट नाही. मला याचं काहीच आश्चर्य वाटत नाही'.

Supriya sule
OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत; राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची पटोलेंची मागणी

दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. भाजपच्या या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याविषयी पत्र लिहिलं. त्यावर भाष्य करताना तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com