शेडगाव जुनापानी येथे शेतातील तलावात बुडून चिमुकल्या बहीण- भावाचा मृत्यू

शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात दोघे बहीण- भाऊ शेतात खेळत असताना शेतातील तलावात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Wardha Crime
Wardha Crime सुरेन्द्र रामटेक

सुरेन्द्र रामटेक

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेडगाव (Shedgaon) जवळील जुनापाणी परिसरात दोघे बहीण- भाऊ शेतात खेळत असताना शेतातील (Farm) तलावात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आता उघडकीस आली असून मृत मुले दोघेही बहीण- भाऊ आहेत.

हे देखील पहा-

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे.  त्यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते. हे कुटुंब (Family) त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहत असे मुलांचे आई- वडील शेतात काम करत असताना मात्र, मुले काल सायंकाळच्या सुमारास ५ वर्षीय शीतल शैलेश कुमरे व ३ वर्षीय शिवम शैलेश कुमरे हे दोघे शेतातील परिसरात असलेल्या तलावावर खेळत असताना अचानक दोघेही तलावात बुडाले आहेत.

Wardha Crime
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी अड्ड्याचा पर्दाफाश; शस्त्र आणि दारूगोळा जप्त

मात्र, रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न आल्याने त्यांचा शोध आई- वडिलांनी घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात दिसले आहे. या घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना (police) देण्यात आली. तात्काळ पोलिसांनी घटना स्थळ गाठत पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com