महाराष्ट्रात निवडणूक आयोगानं राबवलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी म्हणजेच एसआयआर मोहिमेची प्रारुप मतदार यादी जाहीर केलीय़. प्रारुप मतदार यादीतून महाराष्ट्रात 2 कोटींहून अधिक मतदार वगळण्यात आलेत. विशेष म्हणजे, SIR मोहिमेचा सर्वाधिक फटका मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांना बसलाय. फक्त 3 जिल्ह्यांतून तब्बल 84 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती मतदार वगळलेत ते पाहुयात...
3 जिल्ह्यांतून 84 लाख नावं गायब
जिल्हा वगळलेले मतदार
पुणे 28,66,481
ठाणे 28,59,377
मुंबई उपनगर 26,58,202
SIR मोहिमेतून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्याची मागणीही विरोधकांनी केलीये. एव्हंढच नाही तर, SIR मोहिमेच्या अंमलबजावणीवरून राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. मात्र, लाखोंच्या संख्येनं मतदार अपात्र ठरवल्यानं या जिल्ह्यांमधल्या मतदारांच्या संख्येत मोठी घट होण्याची चिन्हं आहेत. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये जवळपास ७० पेक्षा जास्त आमदार आणि तब्बल 13 खासदार आहेत. त्यामुळे वगळलेल्या मतदारांचा यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यात किती आमदार खासदार आहेत ते पाहूयात...
मुंबई
मुंबईमध्ये एकूण 6 लोकसभा खासदार आणि 36 विधानसभा आमदार आहेत
ठाणे
ठाणे जिल्ह्यात एकूण 3 लोकसभा खासदार आणि 18 विधानसभा आमदार आहेत.
पुणे
पुणे जिल्ह्यात एकूण 4 लोकसभा खासदार आणि 21 विधानसभा आमदार आहेत
या तीन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २५ ते २८ लाखांपर्यंत
मतदार गायब झाल्यामुळे काही हजारांनी जय-पराजय ठरत असलेल्या मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांचे पारंपरिक व्होट बँक कॅल्क्युलेशन बिघ़डण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष ज्या जुन्या मतदारयाद्यांच्या बळावर घरोघरी प्रचार यंत्रणा राबवत होते, त्या याद्या आता निरुपयोगी ठरल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना आता नवीन प्रारूप यादीनुसार आपल्या मतदारांचा शोध घ्यावा लागणार आहे. आणि यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना विजयाचं गणित आणण्यासाठी नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.