Politics: महायुतीत धुसफूस! भाजपकडून शिंदेंच्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; फोडाफोडीचं राजकारण सुरू

Sindhudurg Politics News: सिंधुदुर्गमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा समोर. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची थेट फडणवीसांकडे तक्रार. शिवसेनेवर कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा आरोप.
Sindhudurg Politics News
Sindhudurg Politics NewsSaam Tv News
Published On
Summary
  • सिंधुदुर्गमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा समोर

  • भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची थेट फडणवीसांकडे तक्रार

  • शिवसेनेवर कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा आरोप

  • कुडाळ-मालवण व सावंतवाडी मतदारसंघात तणाव शिगेला

गणेश कवडे, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करत, शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महायुतीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

भाजप जिल्ह्याध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत गंभीर आरोप केले आहेत. सावंत यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी आर्थिक आमिष आणि विकासकामांची आश्वासने देत आहेत.

Sindhudurg Politics News
Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; नक्की काय घडलं?

विशेषतः कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघांमध्ये अशा हालचाली सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपने वारंवार महायुतीतील आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले असतानाही, शिवसेनेच्या काही नेत्यांकडून संघटनात्मक हस्तक्षेप केला जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केलंय.

Sindhudurg Politics News
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रलोभनांची खेळी दिली जात आहे, असा देखील आरोप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला. भाजपचे अनेक कार्यकर्ते प्रामाणिकपणे पक्षासाठी कार्यरत आहेत. मात्र त्यांना सातत्याने दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहे, असेही यावेळी ते म्हणाले.

Sindhudurg Politics News
Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेत धुत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com