Bribe Case : कोकणात खळबळ! बड्या अधिकाऱ्याने NOC साठी मागितली खड्याची अंगठी; असा अडकला ACB च्या जाळ्यात

Kudal Bribe Case News : कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर ACBच्या जाळ्यात. व्यवसायासाठी NOC मिळवून देण्यासाठी १२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याचा आरोप.
Sindhudurga Bribe Case News
Sindhudurga Bribe Case News AI Image
Published On
Summary
  • कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर ACBच्या जाळ्यात

  • व्यवसायासाठी NOC मिळवून देण्यासाठी स्वीकारली लाच

  • १२०० रुपये किमतीची खड्यासह चांदीची अंगठी लाच म्हणून घेतल्याचा आरोप

विनायक वंजारे, कुडाळ

कोकणातील चिपळूण तालुक्यात ७ १२ साठी महसूल मंडळ अधिकाऱ्याने लाच घेतल्याची घटना ताजी असतानाच आता सिंधुदुर्गातील कुडाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर हा ACB च्या जाळ्यात अडकला. व्यवसायासाठी NOC मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १२०० रुपये किमतीची खड्यासह चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या घटनेनंतर नगरपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला कुडाळ नगरपंचायतीकडून व्यवसायासाठी ना हरकत दाखला मिळवायचा होता. हा दाखला मिळवून देण्यासाठी स्वच्छता निरीक्षक नाटेकर याने तक्रारदाराकडे चांदीची अंगठी देण्याची मागणी केल्याचे समोर आले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Sindhudurga Bribe Case News
Kalyan Latur Expressway : कल्याणवरून लातूरला पोहचा फक्त ४ तासांत, नवा महामार्ग होतोय तयार; कुठून कसा करता येणार प्रवास?

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर संबंधित विभागाने कारवाईची तयारी केली. त्यानुसार तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारताना नाटेकर याच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान त्याने तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत विभागाकडून सांगण्यात आले.

Sindhudurga Bribe Case News
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

दरम्यान, कारवाईपूर्वी नाटेकर याला संशय आल्याचेही तपासात समोर आले आहे. संशय आल्यानंतर त्याने घेतलेली चांदीची अंगठी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच या माध्यमातून लाचेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे कुडाळ नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, कारवाईनंतर नगरपंचायत प्रशासनाकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com