Nashik News : जितेंद्र आव्हाडांनी सिंधी समाजाची माफी मागावी, अन्यथा...

आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने झाली.
jitendra awhad
jitendra awhadsaam tv

- तबरेज शेख

Nashik News : माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी उल्हासनगर शहरातील आयोजित एका कार्यक्रमात सिंधी समाजाबद्दल (sindhi community) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. या वक्तव्यामुळे सिंधी समाजाचा अपमान झाल्याची भावना समाजाने व्यक्त करीत आव्हाड यांचा नाशिक येथे निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

jitendra awhad
Wardha News : वर्धेतील बॅंकेच्या १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांवर सायबर चाेरट्यांचा डल्ला

उल्हासनगर प्रभात गार्डन, कॅम्प-5 जवळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात बोलतांना आव्हाड यांची जीभ घसरली. आव्हाड यांनी सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिली. त्यामुळे सिंधी समाज आक्रमक झाला आहे.

दरम्यान यामुळे सिंधी समाज आक्रमक झाला. यापुढे समाजाचा अपमान सहन केले जाणार नाही असे नाशिक तपोवन लिंक रोड येथील रामी भवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निषेध बैठकीत निर्धार करण्यात आला. यावेळी आव्हाडांवर सिंधी समाजाचा राग दिसून आला. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाची लेखी माफी मागावी अशी मागणी होत आहे.

jitendra awhad
AAP Swarajya Yatra : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे आम आदमी पार्टी फुंकणार रणशिंग; उद्या 'आप'ची स्वराज्य यात्रा काेल्हापूरात

आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुणा व्यक्ती वर टिप्पणी करताना आव्हाड यांनी जहरी टीका केली. त्यांच्या विधानाने सिंधी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून समाजाचा अपमान झाल्याने युवा वर्गाकडून मोठा विरोध होत आहे.

उल्हासनगर पाठोपाठ नाशिक सिंधी पंचायतीने जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून लवकरच आव्हाड यांच्यावर सिंधी समाजातर्फे नाशिक शहरात गुन्हा दाखल व्हावा यासाठी तक्रार करण्यात येणार आहे.

jitendra awhad
Vasantrao Kale Sugar Factory Election : वसंतराव काळे साखर कारखाना निवडणूक: NCP च्या तिस-या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल, शरद पवारांच्या बैठकीकडे लक्ष

जो पर्यंत जितेंद्र आव्हाड संपूर्ण सिंधी समाजाची लेखी माफी मागत नाही तो पर्यंत कायदेशीर लढा सुरूच राहील आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन आणि मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सिंधी समाजाने बैठकीतून आव्हाड यांना दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com