सुशील थोरात
श्रीगोंदा (अहिल्यानगर) : श्रीगोंदा- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील (Shrigonda) श्रीगोंदा- पाथर्डी विधानसभा मतदारसंघांची जागा हि महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली आहे. दरम्यान या मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप हे इच्छुक होते. मात्र सदरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने राहुल जगताप हे नाराज झाले होते. यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक लढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अनुराधा नागवडे या शिवसेना (Shiv sena) ठाकरे गटाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरत प्रचार करत आहेत.
दरम्यान आघाडी धर्म न पाळता राहुल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोप केले होते. त्यामुळे जगताप यांच्यावर कारवाई व्हावी; अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाची होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांना अखेर पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच बंडखोरी करणारे राजू तिमांडे यांच्यावर देखील निलंबांची कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.