Solapur News: वधू-वरांना जेवण, ९५० वर्षांची परंपरा, पुरणपोळीचा नैवेद्य; कसा असतो योगदंडाचा पूजन विधी सोहळा?

Shri Siddheshwar Maharaj: सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या हातातील योग दंडाची पुजाविधी सोहळा पार पडला आहे. कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अ‍ॅड.रितेश थोबडे यांच्याहस्ते विधिवत पुजा करण्यात आली आहे.
Yog dand
Yog dandSaam Tv News
Published On

विश्वभूषण लिमये,साम प्रतिनिधी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या हातातील योग दंडाची पुजाविधी सोहळा पार पडला आहे. योगदंडाची पुजा शुक्रवारी पार पडली असून, कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अ‍ॅड.रितेश थोबडे यांच्याहस्ते विधिवत पुजा करण्यात आली आहे. योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्‍वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला असून, योगदंड पूजनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

अक्षता सोहळ्यात वधू-वरांना घरी जेवणाला बोलावण्याची प्रथा आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर महाराज साडेनऊशे वर्षांपूर्वी कै.रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवले होते. तीच परंपरा आजतागायत कायम ठेवत सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या हातातील योगदंड कसब्यातील शेटे यांच्या वाड्यात आणण्यात आले. नंतर केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि पुजा करण्यात आली.

Yog dand
Crime News: पिंकीला कुणी मारलं? हत्येनंतर ६ महिने फ्रीजमध्ये ठेवलं, भयंकर घटनेचं रहस्य उलगडलं

मानकरी सिध्देश्‍वर कंठीकर यांनी कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंड, कै.रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. त्यानंतर योगदंड चौरंग पाटावर ठेवून, कुमकुम फुले वाहून, विधिवत पूजा करण्यात आली. कै.शेटे यांचे वारसदार अ‍ॅड.मिलिंद थोबडे यांचे पुत्र रितेश थोबडे यांनी मानकरी सागर हिरेहब्बू आणि हब्बू यांची पाद्यपूजन केले. नंतर योगदंडास केळीच्या पानामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखला.

Yog dand
Vande Bharat Express: गर्दीवर उतारा! वंदे भारत ट्रेनला जोडणार आणखी ४ डबे; आता बिनधास्त प्रवास करा

अ‍ॅड.मिलिंद थोबडे यांना १९८७ पासून सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाची पूजा करण्याचा मान आहे. जानेवारी २०१२ साली २५ वर्ष झाल्याबद्दल आपला वारसा चिरंजीव अ‍ॅड.रितेश थोबडे यांच्याकडे त्यांनी सोपविला. गेल्या १० वर्षांपासून ऍड.रितेश थोबडे यांच्याहस्ते योगडांची पूजा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com